भारतीय संघाच्या धमाकेदार खेळीमुळे सिडनी कसोटी सामना अनिर्णीत राहिला. माञ, या कसोटी सामन्यात सिराज आणि बुमराह यांना वर्णद्वेषीच्या छेडछाडीचा सामना करावा लागला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांनी त्यांच्याविषयी वर्णद्वेषी टिपण्णी केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारावर सर्व आजी-माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्येच आता ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर यानेही आपले मत व्यक्त केले आहे. या सर्व घडलेल्या प्रकारावर वॉर्नरने सामन्यानंतर इन्स्टाग्राम पोस्ट लिहून भारतीय संघ आणि मोहम्मद सिराजची माफी मागितली आहे. तर आपल्या प्रेक्षकांना जांगलेच सुनावली आहे.
क्रिकेटमध्ये वर्णद्वेषी टीकेला कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी अशा प्रकारचे कृत्य करु नये, असे आवाहन आपल्या पोस्टमध्ये डेव्हिड वार्नर याने केले आहे. डेव्हिड वॉर्नरने तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये प्रेक्षकांकडून घडलेल्या प्रकरणावर माफी मागितली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट लिहून टीम इंडियाची माफी मागताना मोहम्मद सिराजची देखील माफी मागतली आहे. वॉर्नरशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यानेही प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या वर्णद्वेषी टिपणीबद्दल माफी मागितली.