केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशाला चांगली बातमी दिली आहे. डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनावर व्हॅक्सीन तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन वर्ष सुरू होताच एकापेक्षा जास्त कोरोनाची लस देशात उपलब्ध होईल अशी अपेक्षा डॉ. हर्षवर्धन व्यक्त केली आहे.
देशात कोरोना झपाट्याने वाढत आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे रूग्ण 71 लाख 73 हजार 565 वर पोहोचला आहे. 710 लोक मरण पावले. देशातील सक्रिय प्रकरणांमध्ये 21 दिवसांतील सर्वात मोठी घट झाली आहे. 24 तासांत 25 हजार प्रकरणे कमी झाली आहेत. या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यसाठी नवीन वर्ष सुरू होताच एकापेक्षा जास्त कोरोनाची लस देशात उपलब्ध होणार असल्याची दिलासादायक बातमी डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनावर व्हॅक्सीन तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन वर्ष सुरू होताच एकापेक्षा जास्त कोरोनाची लस देशात उपलब्ध होईल. देशभरात लसीचे वितरण नियोजनाच्या कामाला प्रांरभ झाला आहे. डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, अशी अपेक्षा आहे की जुलै 2021 पर्यंत आपण देशात 20 ते 25 कोटी लोकांना लस देण्यास सक्षम होऊ.