नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट कायम असल्याचे समोर येते आहे. मागील २४ तासांत देशभरात १२ हजार ४२५ रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णसंख्या २३८ दिवसांपैकी सर्वात कमी आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.१९ टक्के आहेत. देशात मागील २४ तासांमध्ये ३६५ जणांचा मृत्यू झाला असून १५ हजार ९५१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी ३५ लाख ८३ हजार ३१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  
देशात सध्या १ लाख ६३ हजार ८१६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. विकली पॉझिटीव्हीटी रेट १.२४ टक्के असून डेली पॉझिटीव्हीटी रेट १.१० टक्क्यांवर आहे. देशात गेल्या २४ तासांत ६४ लाख ७५ हजार ७३३ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यत १०२ कोटी ९४ लाख १ हजार ११९ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.