बिहारमधील विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया बुधवारी पहिल्या टप्प्यात पार पडणार आहे. मतदानापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टिका केली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, बिहारमधील नितीश कुमारांचे सरकार अहंकारात बुडालेले आहे. आता या अहंकारी सरकारला बदलण्याची वेळ आली आहे.


नितीश कुमारांच सरकार भरकटले : बिहारच्या ऐतिहासिक पवित्र भूमीला मी नमन करते. आज बिहारमधील सत्ता आणि अहंकारात बुडालेले सरकार आपल्या मार्गावरुन भरकटले आहे. आज कामगार असहाय्य झाले आहेत. शेतकरीही चिंतेत आहेत. तर तरूण वर्गही निराश आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

दिल्ली आणि बिहारमधील सरकार बंदी घालणारी : अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीचा लोकांना प्रचंड त्रास होत आहे. बिहारची जनता आज काँग्रेस महाआघाडीसोबत उभी आहे. आज बिहारची हीच मागणी आहे. दिल्ली आणि बिहारमधील सरकार बंदी घालणारी आहेत. नोटबंदी, व्यापार बंदी, आर्थिक बंदी, शेती बंदी आणि रोजगार बंदी केली जात आहे. याविरोधात बिहारमधील जनता एकजूट झाली आहे. आता बदल करण्याची वेळ आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या आहे.