नवी दिल्ली - काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहूल गांधी आज गोव्यात दाखल झाले आहेत. दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनिया आणि राहूल गांधी काही वेळापूर्वीच पणजी विमानतळावर दाखल झालेत. दिल्लीतील वाढत्या वायु प्रदूणाषामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनिया गांधी एका आठवड्यासाठी गोव्यात मुक्कामी राहतील.

सोनिया गांधी यांना दम्याचा त्रास होतो. हिवाळ्यात तो बळावण्याची शक्यता असते. त्याच बरोबर छातीमध्ये इन्फेक्शनही झाले आहे. त्यामुळे दिल्लीत्या हवेत आजार बळावण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळे काही दिवस दिल्लीबाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शुक्रवारी दुपारी सोनि गांधी या गोव्यात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी सोबत होते. गोव्यात हिवाळ्यातील वातावणर उत्तम असते. त्यामुळे त्यांनी गोव्याची निवड केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तसेच दिल्लीस कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोनाचा कहर वाढतच आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये भर पडत आहे. तसेच केजरीवाल सरकारने शहरात अनेक निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात सोनिया गांधी यांना प्रकृती बिघडल्याने सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.