नवी दिल्ली : आज कॉंग्रेसच्या कार्य समितीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु, या बैठकीत मेमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सुञांनी दिली आहे.  मेमध्ये पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे, असे सुञांनी सांगितले आहे. या पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्यासह सुशीलकुमार शिंदे आणि मीराकुमार हे नेते शर्यतीत आहे, अशी माहिती मिळते आहे. 

काँग्रेसच्या कार्य समितीची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र,आजच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. या बैठकीत मेमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सुञांनी दिली आहे. 

शिंदे यांचाही दावा : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद जाण्याची दाट शक्यता होती. मात्र गेहलोत यांनी दिल्लीत जाण्यास नकार दिला आहे. राजस्थानचीच जबाबदारी सांभाळण्यात स्वारस्य असल्याचे त्यांनी हायकमांडला कळवले आहे. त्यामुळे, गेहलोत यांचे नाव मागे पडले आहे. पक्षाध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमधील असंतुष्टांच्या गोटातही शिंदे यांच्या नावाला पाठिंबा  आहे. सध्या शिंदे दिल्लीत आहेत. अर्णव गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटप्रकरणाची माहिती घेण्यासाठी हायकमांडकडून शिंदे यांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. त्यामुळे, शिंदे यांच्या गळ्यात पक्षाध्यक्ष पदाची माळ पडू शकते.