मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांना कोरोनाची लागन झाली, अशी माहिती पाटील यांनी ट्विट करून दिली आहे. शेवटच्या दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना टेस्ट करून घ्यावी,असे अवाहन पाटील यांनी केली आहे.

[removed][removed]

गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी एच. के. पाटील मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात राज्यातील नेत्यांबरोबर बैठकीही घेतली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. पाटील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने काँग्रेसच्या या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.