नवी दिल्ली : लॉकडाउन बाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक 6 ची नव्याने नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत लागू करण्यात आलेली अनलॉकच्या निर्बंधांना आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

आज दि. 27 ऑक्टोबर रोजी गृह मंत्रालयाने पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार रिओपनिंगबाबत 30 सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सामाजिक / शैक्षणिक / क्रीडा / करमणूक / सांस्कृतिक / धार्मिक / राजकीय कार्यक्रमांसाठी बंद जागांमध्ये हॉल क्षमतेच्या जास्तीत जास्त 50% आणि 200 जणांच्या कमाल मर्यादेसह वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.