पाटणा : बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागातील गंगा नदीत मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीत100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली असून यातील अनेक प्रवासी बेपत्ता आहे. या बोटमध्ये लहान मुले आणि महिलादेखील होत्या. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवण्यात आल्या होत्या.
बोट उलटल्याच्या दुर्घटनेनंतर किनाऱ्यावरील नागरिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे. या घटनास्थळी प्रशासनदेखील दाखल झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, अद्यापही अनेक जण बेपत्ता आहे. बचाव कार्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
बोट पलटल्यानंतर अनेक जण या बोटीतून उडी मारुन पोहत सुरक्षितपणे किनाऱ्यावर दाखल झाले. त्यानी या घटनेची अधिक माहिती दिली की, गंगा नदीच्या किनाऱ्या लगत गोपालपूर भागात गावकरी आपल्या शेतात मका पेरणीसाठी जात होते. गंगा नदिच्या पलिकडे त्यांची शेती आहे. गावातील जवळपास 100 ते 125 नागरिक या बोटीतून एतञ प्रवास करत होते. ही बोट अर्ध्या नदीत आल्यानंतर अचानक वादळात फसली. किनाऱ्यावरील उभे असलेले नागरिक बोटीची वाट पाहत होते. त्यांना या दुर्घटना माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले.