नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा हाहाकार उडाला असताना आता ‘ब्लॅक फंगस’च संकट घोंघावू लागले आहे. कोरोनामुळे ‘म्यूकोरमायसिस’ प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या आजारामुळे डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. म्यूकोरमायसिस एक करोनामुळे होणारे फंगल संक्रमण आहे.
‘आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. मागील दोन दिवसात म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण भरती झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आले होते. तसेच नाक आणी गळ्याचे हाड गळून गेले होते. असे गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी स्पष्ट सांगितले आहे.
मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे, असे ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले आहे. ब्लॅक फंगसची लक्षण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. खासकरून मधुमेह, किडनी, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक आहे.