बिहारच्या मागील चार विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. निवडणूक डेटा विश्लेषणानुसार, भाजपाने यात विजय मिळवला आहे. बिहारमध्ये दोन अंकी संख्या गाठणारा एकमेव राष्ट्रीय पक्ष भाजप ठरला आहे.
बिहारच्या निवडणुकीतील सहा राष्ट्रीय पक्षांची मतांची टक्केवारी बघीतली तर २००५ मधील २३.५७ टक्क्यांपासून ते २०१५ मध्ये ३५.६ टक्क्यांवर पोहोचली आहे. एनडीएच्या कार्यकाळात बिहारचे विभाजन झाल्यानंतरही भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २००५ मध्ये मतांची टक्केवारी १०.९७ टक्के होती, जी २०१५ मध्ये २४.४२ टक्क्यांवर गेली आहे. यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे २०१५ मध्ये भाजपाने एकूण १५७ जागांवर निवडणूक लढवली होती. २०१५ मधील विधानसभा निवडणूक वगळाता भाजपा जेडीयूसोबतच लढली आहे. इतर पक्षांनीही जास्त जागांवर निवडणूक लढली होती, मात्र त्यांच्या मतांच्या टक्केवारीत जास्त वाढ झाली नाही.रणनीती आखत बसपाने २०१५ मध्ये सर्वाधिक २२८ जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपाने १५७, सीपीआयने ९८, सीपीएमने ४३, काँग्रेसने ४१ आणि एनसीपीने ४१ जागांवर निवडणूक लढवली. पण काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत घट झालेली दिसून येत आहे. २००५ मध्ये भाजपाने १०२ जागांवर उमेदवार दिले होते, २०१५ मध्ये ही संख्या १५७ होती. त्यावेळी त्यांची मतांची टक्केवारी १०.९७ वरुन २४.४२ टक्क्यांवर पोहोचली होती. काँग्रेसने २०१० मध्ये सर्वाधिक २४३ आणि २०१५ मध्ये फक्त ४१ जागांवर उमेदवार दिले. २००५ मध्ये ५ टक्के असणारी मतांची टक्केवारी मात्र फक्त ८.३७ टक्के झाली होती.