बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता गती घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. बिहारच्या निवडणूकीतील प्रचारात रोहतास येथे भाजपाकडून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज सभा पार पडली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

जे. पी. नड्डा म्हणाले, राजकारणात घोषणाबाजी करणे सोपे आहे. मात्र, गरीब जनतेची सेवा तोच करु शकतो ज्याची ५६ इंचाची छाती असते, असे म्हणत नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच गरिबांचे तारणहार असल्याचे जाहिर केले. बिहारमध्ये आठवड्याभरात चार निवडणूक सभा घेतल्या आहेत. उद्या त्यांची बिहारमध्ये दोन ठिकाणी सभा होणार आहेत.