नवी दिल्ली : केंद्र सरकराच्या नव्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यात घुसून राडा घातला. त्यामुळे, देशभरातून शेतकरी आंदोलनावर टीका होत आहे. कालच्या या हिंसाचार आंदोलनामुळे मी फार दु:खी झालो आहे. त्यामुळे, मी मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातून माघार घेत आहे, अशी घोषणा भारतीय किसान यूनियन (भानु) संघटनेचे अध्यक्ष ठाकुर भानु प्रताप सिंह यांनी केली आहे.
ठाकुर भानु प्रताप सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या घटनेमुळे मी फार दु:खी झालो आहे. त्यामुळे, मी चिल्ला बॉर्डवरून घोषणा करतो की मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनातून माघार घेत आहे. भारतीय किसान यूनियन (भानु)चे धरणे आंदोलन सुरू होते, ते आजपासून संपले अशी घोषणा करतो आहे, असे म्हणत ठाकुर भानु प्रताप सिंह यांनी शेतकरी आंदोलनातून माघार घेतली आहे.