मुंबई - टीआरपी घोटाळा उघड झाल्यानंतर बार्क (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सल) ने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील 3 महिने टीआरपी रेटिंग स्थगित करण्याचे बार्कने जाहिर केले आहे. मुंबई पोलिसांना हा टीआरपी घोटाळा मागील आठवड्यात उघडकीस आणला.

यात रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावे समोर आली होती. प्रेक्षकांना कोणते कार्यक्रम आवडतात, कुठल्या वाहिन्या कोणत्या वेळी किती वेळा पाहिल्या जातात, याची माहिती टीआरपीमध्ये मिळते. टीआरपी मोजण्याचे काम बार्क करते. परंतु टीआरपी मोजणाऱ्या यंत्रणेशी छेडछाड करण्यात आली होती. ज्यांच्या घरात हे यंत्र लावण्यात आले होते. त्यांना पैसे देवून विशिष्ट चॅनल दिवसभर पाहण्यास सांगितले होते, त्यानुसार हा टीआरपी घोटाळा झाला होता. हा प्रकाराचा मुंबई पोलिसांनी तपास केला असता, टीआरपी घोटाळा बाहेर आला. बार्कच्या निर्णयाचे न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून स्वागत करण्यात आले आहे. बार्कने योग्य पाऊल उचलेले आहे, अशी प्रतिक्रिया एनबीएकडूनने दिली.

अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या टीआरपी वाढवणाऱ्या वाहिन्यांचे बिंग फोडल्याचा दावा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.