जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. स्टेडियमचे नामकरण करून नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद  असे करण्यात आले आहे.
याच अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून खेळला जात आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची उपस्थिती होती.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी अशा प्रकारच्या स्टेडियमचे स्वप्न बघितले होते. जेकी आज ते पूर्ण झाले आहे. या नवे स्टेडियम जगातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या स्टेडियमच्या आधारवर विकसित करण्यात आले आहे. मोदी यांच्यासोबत मी खुप वर्षांपासून काम करत आहे. त्यांनी तरुणांना नेहमीच खेळासाठी प्रोत्साहित केले आहे, असे मोदी म्हणाले आहे. 

स्टेडियम आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी : २४ फेब्रुवारी २०२० रोजी याच स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्ताने नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोटेरा स्टेडियमध्ये सर्व अत्याधुनिक प्रकारच्या सेवा उपलब्ध असून, पूर्वीच्या स्टेडियममध्ये ५३ हजार प्रेक्षक बसू शकत होते. त्याचा पुनर्विकास करण्यात आल्यानंतर या स्टेडियम आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी झाली आहे.