शिर्डी : शिर्डीच्या साईंचे दर्शन घेण्यासाठी आता भारतीय पेहरावात यावे लागणार. शिर्डीतील साई दर्शानासाठी आता ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. साईबाबाच्या दर्शनासाठी आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लगाणार आहे. याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना तशी विनंती केली आहे.
जगातील अनेक भागातून भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अनेकजण साई दर्शनासाठी पर्यटनाला आलेल्या तोडक्या कपड्यांमध्येच येतात. त्याच कपड्यांमध्ये ते दर्शनालाही जातात, अशी भाविकांची तक्रार होती. या तक्रारीची संस्थानाने दखल घेतली आहे. यापुढे साई मंदिरात भारतीय पेहरावात यावे असे आवाहन भक्तांना संस्थानने केले आहे. संस्थानने मंदिर परिसरात असे सूचनाफलक लावण्यात आले आहे. या फलकात लिहीले आहे की, ‘साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी.’इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत हे सूचना फलक लावण्यात आले आहे.