मुंबई : भारतीय संघ मागील काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. आयसीसीने नुकतीच वार्षिक कसोटी क्रमवारीची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघाने सलग 5 वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. सातत्यपूर्ण कामगिरीने विराटसेनेने अव्वल स्थान कायम राखण्यात यश आले आहे. यावरुन भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे. शास्त्री यांनी ट्विट करत भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
शास्त्री यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये क्रमवारीत अव्वल स्थानसाठी या संघाने दृढ निश्चयासह कठोर मेहनत घेतलेली आहे.  खेळाडूंनी लक्ष्य गाठण्यासाठी सातत्यापूर्ण मेहनत केली आहे. या मुलांनी प्रामाणिकपणे ही कमाई केली. या दरम्यान अनेक अडचणी आल्या. या खेळाडूंनी या अडचणींचा सामना केला. त्यावर मात केली. या निर्भिड आणि बिंधास्त खेळाडूंवर मला गर्व आहे, असे शास्त्री म्हणाले.

[removed][removed]