श्रीहरिकोटा - इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशनने (इस्त्रो) श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून गुरुवारी कम्युनिकेशन सॅटेलाईट लाँच केले आहे. इस्त्रोने गुरुवारी दुपारी 3 वाजून 41 मिनीटांनी भारताचा नवीन कम्युनिकेशन उपग्रह लॉन्च केला आहे. CMS01 ला PSLV50 च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यासाठी बुधवार पासून 25 तासांचे काऊंटडाऊन सुरु होते.

CMS-01 भारतचे 42वे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. हे भारताच्या जमिनी क्षेत्रासह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपलाही कव्हर करेल. हे ISRO चे या वर्षातील अखेरचे मिशन आहे. हे सॅटेलाइट सात वर्षे काम करेल. 44 मीटर उंच आणि 4 स्टेज असलेल्या PSLV-C50 'XL' कॉन्फिग्रेशनमध्ये PSLV चे हे 22 वे उड्डाण आहे. नॉर्मल कॉन्फ्रिगेशनमध्ये PSLV 4 स्टेजचे इंजिन असलेले रॉकेट आहे.