नवी दिल्ली : देशात आता म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचे दिसून येते आहे. एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे ब्लॅक फंगसची वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशासमोर दुहेरी चिंता उभी राहिली आहे. देशात ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या वाढून ती आता 8 हजार 848 इतकी झालीये. ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण गुजरातमध्ये सापडले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा आणि आंध्र प्रदेशचा नंबर लागत आहे.
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी ब्लॅक फंगससंबंधी रुग्णसंख्या, त्याच्यावर असलेल्या इंजेक्शनची राज्यांना दिलेली संख्या याची माहिती दिलीये. त्या-त्या राज्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन अतिरिक्त 23 हजार 680 व्हायल्स दिल्याची माहिती दिली आहे.
राज्यांमध्ये सापडलेले ब्लॅक फंगसचे रुग्ण
केंद्रशासित प्रदेश- 442
गुजरात- 2281
महाराष्ट्र- 2000
आंध्र प्रदेश- 910
मध्य प्रदेश- 720
राजस्थान- 700
कर्नाटक- 500
तेलंगना- 350
दिल्ली- 197
उत्तर प्रदेश- 112
पंजाब- 95
छत्तीसगढ़- 87
बिहार- 56
तामिळनाडू- 40
केरळ- 36
झारखंड- 27
ओडिशा- 15
चंडीगढ़- 8
दमन दीव आणि दादरा नगर हवेली- 6
उत्तराखंड- 2
त्रिपुरा- 1
पश्चिम बंगाल- 1
ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या Liposomal amphotericine B इंजेक्शनचे उत्पादन आणि आयात करण्याची परवानगी भारत सीरम अॅन्ड वैक्सीन लिमिटेड, बीडीआर फार्मास्युटिकल्स लिमिटेड, सन फार्मा लिमिटेडसिपला लिमिटेड, लाइफ केयर इनोवेशन, माईलॅन लॅब्स (आयात करणार) या कंपन्यांना दिली आहे.