नवी दिल्ली : हिंदू सेनेने दिल्लीत राडा घातला आहे. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची तोडफोड केली. ओवेसींनी त्यांच्या जाहीर सभांमध्ये हिंदूंच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करू नये. ज्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील आणि जेणेकरून भविष्यात तुमच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ येईल, असा इशारा हिंदू सेनेने म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच लोकांना ताब्यात घेतले आहे.
हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या २४-अशोक रोड, नवी दिल्ली येथील निवासस्थानी निदर्शने केलेले आहे. तसेच खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या निवस्थानाची तोडफोड केली. आंदोलकांनी ओवेसी यांच्या घराबाहेर नेम प्लेट, दिवा आणि खिडकीच्या काचा फोडल्या. या दरम्यान असदुद्दीन ओवेसी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली अन् पोलिस घटनेस्थळी दाखल झाले.  पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाच जणांना ताब्यात घेतले.

काय म्हटली हिंदू सेना? : ओवेसींविरोधात उत्तर प्रदेशात हिंदूविरोधी वक्तव्यांसाठी गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता. तसेच काही वर्षांपूर्वी त्याच्या भावालाही हिंदूविरोधी वक्तव्य केल्याबद्दल अटक केली होती. ओवेसी बंधू नेहमीच मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी हिंदूंचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असतात, असे हिंदू सेनेने सांगितले आहे. 

भाजपा जबाबदार : असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या घरावर झालेल्या हल्याबद्दल भाजपा या धर्मांधतेला जबाबदार धरले आहे.  लोकांच्या या धर्मांधतेसाठी भाजपा जबाबदार आहे. एखाद्या खासदारांच्या घरावर अशा प्रकारे हल्ला झाल्यास त्यातून काय संदेश जातो?, असा सवाल देखील ओवेसी यांनी केला आहे.