नवी दिल्ली :  देशात गेल्या २४ तासात ६३ हजार ५०९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर, ७३० बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारताची कोरोनाबाधितांची संख्या ७२ लाख ३९ हजार ३९० वर पोहोचली आहे. यात ८ लाख २६ हजार ८७६ रूग्णावर उपचार सुरू आहे. तर ६३ लाख १ हजार ९२८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख १० हजार ५८६ इतकी झाली आहे.
मंगळवारी दिवसभर ६० हजारापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली होती. १७ सप्टेंबरला भारतात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. ७ ऑगस्टला भारताने २० लाख रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला होता. तर २३ ऑगस्टला ३० लाख आणि ५ सप्टेंबरला ४० लाखांच्या पुढे रुग्णसंख्या गेली होती. यानंतर १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख आणि ११ ऑक्टोबरला ७० लाख अशी रुग्णसंख्या वाढत गेली. सध्या एकूण रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० इतकी आहे.