नवी दिल्ली : सर्वाधीक लोकप्रीय ठरलेला इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी आता पाठ फिरवली आहे. 2015-16 पासून काही अभियांत्रिकी महाविद्यालये बंद व्हावीत यासाठी अर्ज करत आहे. इतरांमधील क्षमतेत लक्षणीय घट झाल्यामुळे भारतातील अभियांत्रिकी संस्थांमधील एकूण जागांची संख्या एका दशकात सर्वात कमी झालेली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट होऊन त्या २३.२८ लाखांवर आलेल्या आहेत.
या वर्षामध्ये इंजिनीअरिंगसाठीच्या जागांमध्ये मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.  तसेच इंजिनीअरिंगच्या अनेक शिक्षणसंस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, असे  असूनही शिक्षणक्षेत्रामधल्या एकूण जागांपैकी ८० टक्के जागा या इंजिनीअरींगच्या आहेत. २०१४-१५ साली तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये सर्वाधिक म्हणजे साधारण ३२ लाख जागा होत्या. सात वर्षांपूर्वीपासूनच इंजिनीअरींगच्या जागांमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे अनेक महाविद्यालये बंद पडली. २०१५-१६ पासून दरवर्षी किमान ५० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली आहेत आणि आता या वर्षी ६३ महाविद्यालयं बंद पडणार आहेत.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण परिषदेने ५४ नवीन शिक्षणसंस्थांना मान्यता दिलेली आहे. जर राज्य सरकारला नव्या शिक्षणसंस्था उभारायच्या असतील तर या मागासलेल्या जिल्ह्यांतल्या शिक्षण संस्थांना परवानगी देण्यात आहे, असे परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना स्पष्ट केले आहे.