नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 15 हजार 906 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर काल (शनिवारी) 561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 54 हजार 269 वर पोहोचला आहे. 
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेली माहिती अशी की, देशात सध्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या एक लाख 72 हजार 594 वर पोहोचली आहे. तर यापैकी एक लाख 74 हजार 594 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाचे तीन कोटी 35 लाख 48 हजार 605 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.