जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज, दि. ११ ऑक्टोबरला दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. भारतीय सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
भारतीय सैन्याने गुप्त माहितीच्या आधारे पुंछ भागातील जंगलात ३ ते ४ दहशतवाद्यांना घेतले होते. त्यानंतर ही चकमक उडाली. सध्या सैन्याने या पूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे. पुंछ जिल्ह्यातील सुरणकोटे भागात डेरा की गली या गावात हे सैन्य अभियान सुरू आहे.