नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे १६ हजार ३२६ रुग्ण आढळले आहे. यात ६६६ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७२८ इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
केरळमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या २७ हजार ७६५ इतकी झाली होती. हा आकडा केरळने मागील आकडेवारीतील ५६३ मृत्यू समाविष्ट केल्यानंतर झालेत. २१ ऑक्टोबरला केरळ सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना मृत्यूंची एकूण संख्या २७ हजार २०२ इतकी होती. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) ९९ मृत्यूंची नोंद झाली. याशिवाय पुरेशा कागदपत्रांअभावी आकडेवारीत समाविष्ट करायचे राहिलेले १४ जून २०२० पर्यंतच्या २९२ मृत्यूंचाही समावेश एकूण आकडेवारीत करण्यात आला आहे. तसेच नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार १७२ मृत्यूंचा समावेश कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आला. यासह केरळमधील एकूण मृतांची संख्या २७ हजार ७६५ झाली आहे, अशी माहिती केरळ आरोग्य विभागाने दिलीय.