नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाचे मोठे नुकसान करून ठेवले आहे. दुसऱ्या लाटेत जर मोदी सरकारने वेळीच योग्य ती पावले उचलली असती तर देशात १३ कोटी रुग्णांना कोरोनापासून वाचवता आले असते. तसेच, १ लाख मृत्यू टाळता आले असते, असे ठाम मत मिशिगन विद्यापीठातील महामारी विज्ञान आणि जागतिक सार्वजनिक आरोग्य या विषयांच्या प्राध्यापिका भ्रमर मुखर्जी यांनी मांडलेले आहे. भ्रमर मुखर्जी यांनी मिशिगन विद्यापीठात भारताच्या कोरोना परिस्थितीवर भाष्य केलेले आहे. प्राध्यापिका मुखर्जी यांनी त्यांच्या अलिकडील अहवालात भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट आणि निर्बंधामध्ये हस्तक्षेप करण्यास विलंब यांनी संभाव्य भूमिका बजावली असे म्हटलेले आहे.
भारतातील दुसर्‍या लाटेच्या वेळी झालेल्या विध्वंससाठी मोदी सरकार प्रामुख्याने जबाबदार होते, असे भ्रमर मुखर्जी यांनी म्हटले आहे.पण दोन किंवा तीन वेळा झालेल्या चुकांसाठी आम्ही सरकारला जबाबदारी आणि दोषातून मुक्त करू शकत नाही असे मुखर्जी यांनी मान्य केले आहे.
द वायरला दिलेल्या मुलाखतीत मुखर्जी त्यांनी दुसर्‍या लाटेवरील त्यांच्या अलीकडील अभ्यासामधील आश्चर्यकारक पण त्रासदायक आणि निराश करणारा निष्कर्ष सांगितला. मुखर्जी म्हणाल्या, जर सरकारने मार्चअखेर किंवा उत्तरार्धात लॉकडाऊन जाहीर केला असता तर दररोजच्या रुग्णांमध्ये ४,१४,००० एवढी वाढ होता अनुक्रमे ही संख्या २०,००० आणि ४९,००० वर असती. १५ एप्रिलपर्यंत अंदाजे २.६ दशलक्ष प्रकरणे टाळता आली असती आणि १५ मे पर्यंत जवळपास १२.९ दशलक्ष प्रकरणे टळली जाऊ शकता आली असती, असे देखील मुखर्जी यांनी सांगितले आहे.
कोरोना मृत्यूंविषयी बोलताना मुखर्जी म्हणाल्या मार्चच्या मध्यापासून किंवा शेवटी लॉकडाऊन लावला असता तर  ९७,००० ते १०९,००० पर्यंत मृत्यू १५ मे पर्यंत टाळता आले असते. १५ मार्च ते १५ मे दरम्यान १,१२,००० मृत्यू झाले होते जे ९० ते ९८ टक्के होते. त्यांनी आपल्या अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे, थोडक्यात सांगायचे झाले तर मार्चमध्ये कोणत्याही वेळी कारवाई झाली असती तर,  निश्चित १ मार्च ते १५ मे दरम्यान झालेल्या ९० टक्के पेक्षा जास्त घटना आणि मृत्यू होण्याची शक्यता टाळता आली असती.
कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट अद्याप संपलेली नसल्याने केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे लसीकरणावर भर देणे आणि नियम-निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला होता.