(संग्रहित छायाचिञ)
नवी दिल्ली :
देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. देशातील गल्ली बोळात कोरोना रूग्ण आढळून येत आहे. देशात मागील २४ तासांत आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढीचे नोंद झाली आहे. देशात १,५२,८७९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली असून ८३९ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारीची माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.