नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबद मोठी घोषणा केली आहे. आपला देश कोरोनाच्या लढाईत एका अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. हा टप्पा कोरोना लसीकरणाचा आहे. येणाऱ्या १६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. जगात सर्वात मोठे लसीकरण अभियान आपल्या देशात पार पडेल, असे मोदी यांनी सांगितले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील राज्यांच्या मुख्यमंञ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान मोदी बोलत होते. 
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स यांना सगळ्यात आगोदर कोरोना लस देण्याचे आमचे प्रयत्न असेल, असे मोदी म्हणाले आहे. तसेच, वेगवेगळ्या राज्यातील फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या संख्या जवळपास 3 कोटी आहे. पहिल्या टप्प्यात या 3 कोटी लोकांना लसीकरण करण्यासाठी जो खर्च येईल तो केंद्र सरकार करणार आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना लस देण्यात येणार आहे. 50 वर्षांच्या  आतील लोकांना म्हणजे ज्यांना कोरोना संक्रमण झाले आहे. त्यांचा जीव धोक्यात आहे, अशा लोकांना कोरोना लस देण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले आहे.