नवी दिल्ली : देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने आज मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६१ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ७० हजार ५८९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ३१ हजार ८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात या जीवघेण्या आजाराने एकूण ७० हजार ५८९ जणांचा बळी घेतलेला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये दररोज वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घसरण पाहायला मिळत आहे. एकूण ८२ हजार १७० नवे रुग्ण आढळले होते, तर एकूण १ हजार ३९ रुग्णांचा मृत्यू झाला होता देशात सध्याच्या घडीला ९ लाख ४७ हजार ५७६ सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या देशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. ICMR ने दिलेल्या आकडीवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ११ लाख ४२ हजार ८११ नव्या चाचण्या घेण्यात आल्या. तर, आतापर्यंत एकूण ७ कोटी ३१ लाख १० हजार ४१ चाचण्या घेतल्या गेल्या आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा झाली असून हा दर ८३.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्यस्थितीला १५.४१ टक्के रुग्ण सक्रिय अवस्थेत आहेत. तर, मृत्युदर २ टक्क्यांच्या खालीच (१.५६ टक्के) असून पॉझिटीव्हीटीचा दर ६.१७ टक्के झाला आहे.