औरंगाबाद / प्रतिनिधी

  वर्षभरात सलग दोनवेळा आरोग्याच्या तक्रारींवर होणार हजारोंचा खर्च मेडिक्लेम पॉलिसीमुळे सुसह्य झाला. आदर्श संस्थेची मेडिक्लेम पॉलिसी घेतलेल्या ग्राहकाला त्याची त्वरित प्रतिपूर्ती मिळाली. यामुळे ग्राहकाला मोठा दिलासा मिळाला आहे.

  दररोजच्या धकाधकीच्या जीवनात खाण्यापिण्याच्या वेळेत होणार बदल, दैनंदिन सवयीत होणारे बदल आदी कारणांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम घडून येतो. प्रसंगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी मोठा खर्चही करावा लागतो. मात्र, हा खर्च परस्पर होत असेल तर याचा मोठा दिलासा रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना होतो. असेच काही घडले किरण देशमुख यांच्याबाबत ! किरण देशमुख हे एका खासगी कार्यालयात कॅशिअर पदावर करीत आहेत. जेमतेम वेतनावर ते आपला घरखर्च चालवितात. दरम्यान, त्यांची पत्नी यांना काविळीची लागण झाली. भयभीत झालेल्या किरण देशमुख यांनी पत्नीला जवळ असलेल्या चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयाने त्यांच्या पत्नीवर त्वरित खात्रीशीर उपचार करून त्यांना कावीळमुक्त केले. मात्र यासाठी 34 हजार 429 रुपये इतका खर्च त्यांना आला. किरण देशमुख यांनी आदर्श संस्थेकडून मेडिक्लेम पॉलिसी घेतली होती. देशमुख यांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाला कळवली. रुग्णालयाने देशमुख यांना त्वरित आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण फाईल तयार करून दिली. देशमुख यांनी ही फाईल आदर्श संस्थेकडे दाखल करून प्रतिपूर्तीसाठी क्लेम सादर केला. काही दिवसातच आदर्श संस्थेकडून त्यांचा क्लेम मंजूर होऊन त्यांना 100 टक्के प्रतिपूर्ती मिळाली.

दोन्ही उपचारांचा खर्च मिळाला परत.

  काविळीतून बरे झाल्यानंतर काही महिन्यांनी देशमुख यांच्या पत्नीला टायफाईडचा त्रास सुरु झाला. याचा उपचारदेखील चव्हाण हॉस्पिटल येथे करण्यात आला. यावेळी त्यांना 31 हजार 496 रुपये इतका खर्च आला. यावेळीदेखील देशमुख यांनी मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत आदर्श संस्थेकडे क्लेम सादर केला. याची प्रतिपूर्तीदेखील काही दिवसातच देशमूख यांना मिळाली. दोन्ही उपचारांसाठी आलेला 65 हजार 925 हजार रुपयांचा खर्च पूर्णपणे परत मिळाल्याने देशमुख यांनी आदर्श संस्थेचे आभार मानले आहेत. सर्वसामान्य कुटुंबांना ऐनवेळी उपचारासाठी होणार खर्च उचलण्यात मेडिक्लेम पॉलिसीचा मोठा आधार होत असल्याची भावना देशमुख यांनी व्यक्त केली.

आरोग्य विमा पॉलिसी महत्त्वाचीच !.........

  आरोग्य विमा काढावा असे मला कधी वाटलेच नव्हते. मी व माझे कुटुंब तंदुरुस्त आहे, आम्हाला कधीही काहीही होणार नाही, असा माझा गैरसमज होता. मात्र तो या घटनांमुळे चुकीचा ठरला. तीन वर्षांपूर्वी आदर्श संस्थेच्या अधिकार्‍यांनी माझ्याकडे जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी काढण्यासाठी प्रस्ताव ठेवला तेव्हा सुरुवातीला मी नकार दिला होता. मात्र त्यांनी याचे दूरगामी फायदे समजावून सांगितले. त्यामुळे मी ही पॉलिसी घेतली होती. मात्र याचा कधी लाभ घेण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. अशातच माझ्या पत्नीला सलग दोनवेळा झालेल्या आरोग्याच्या तक्रारींवर केलेल्या उपचाराचा खर्च 100 टक्के मला पूर्णपणे मिळाल्याने मेडिक्लेम पॉलिसीचे महत्व मला समजले आहे. वार्षिक 6 हजार 600 रुपयांत मला मेडिक्लेमचा लाभ मिळत असल्याने प्रत्येकाने ही पॉलिसी काढावी असे मी आवाहन करेन. मी माझ्या मित्रांना तसेच नातेवाईकांनादेखील मेडिक्लेम पॉलिसी घेण्यासाठी आग्रह करणार आहे.
-किरण देशमुख, पॉलिसीधारक.