नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना जनतेला दिलासा देणारी घोषणा केंद्रीय मंञी प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. देशातील १० करोड लोकांना मोफत लस देण्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्र सरकारने केली आहे. १ मार्चपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना अन्य अजार नसणाऱ्या लोकांना ही कोरोना लस दिली जाणार आहे, असे मंञी प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
मंञी प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, ही कोरोन लस १० हजार सरकारी केंद्रात आणि २० हजार खाजगी केंद्रात देण्यात येणार आहे. माञ, जे खाजगी केंद्रात लस घेतील, त्यांना कोरोना लसीची जी फीस ठरवली जाईल, ती द्यावी लागणार आहे. तर, जे सरकारी केंद्रात कोरोना लस घेतील, त्यांना कुठलीही फीस आकरण्यात येणार नाही, असे जावडेकर म्हणाले आहे. खाजगी केंद्रातील लसीची फीस किती असेल, याची घोषणा येत्या दोन-तीन दिवसात करण्यात येईल, असे जावडेकर यांनी सांगितले आहे. 

[removed][removed]