मुंबई : जगात धुमाकुळ घालणाऱ्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी 2021 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी तसे संकेत दिले आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोनावरची लस २०२१ च्या जानेवारी महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. पण त्यासोबत काही आव्हानांचाही सामना आपल्याला करावा लागेल असे मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केले.
डॉ. रणदीप गुलेरिया इंडिया टुडेच्या कार्यक्रमात हेल्थगिरी अवॉर्ड्स २०२० या कार्यक्रमात बोलत होते. डॉ. गुलेरिया म्हणाले की, मात्र लस आल्यानंतर सुरुवातीला या लशीची कमतरता भासण्याची शक्यता आहे. आपल्या देशातील लोकसंख्या लक्षात घेता सुरुवातील सगळ्या वर्गांपर्यंत लस पोहचवता येईल की नाही याबाबतच्या आव्हानाला आपल्याला तोंड द्यावे लागेल असेही मत गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रणदीप गुलेरिया यांना करोनावरची लस कधी येईल? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर उत्तर देतांना 2021 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.