औरंगाबाद / प्रतिनिधी,


कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ङ्गमाझे कुटुंब, माझी जबाबदारीङ्ख ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्याबाबत मुख्यमंत्री यांनी निर्देशित केलेले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात व्यापक स्वरूपात लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून या मोहिमेव्दारा कोविड-19 च्या संसर्गापासून बचाव करण्याच्या प्रतिबंधात्मक बाबींबाबत व्यापक जनप्रबोधन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दि.10 आयोजित माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस विविध प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि दुसरा टप्पा 12 ते 24 ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. हे पथक एका दिवसात 50 घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने या मोहिमेतून नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य विषयक माहिती संकलन तसेच लोकांच्या सवयीमध्ये योग्य ते बदल करून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, स्वच्छता, कोणताही आजार अंगावर न काढता तातडीने योग्य वैद्यकीय सल्ला घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जेणेकरून या लोकप्रबोधन, जनशिक्षण आणि जनजागृतीव्दारे कोरोना आजार हा वेळीच निदान करून योग्य उपचाराने बरा होऊ शकतो हा विश्‍वास लोकांमध्ये वाढण्यास मदत होईल. ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.