देशातील सर्व जनतेला कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस मोफत मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लशीकरणारवर केंद्र सरकार ५०० रुपये खर्च करणार आहे. सर्व जनतेला कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याचे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी सांगितले आहे.
बिहार निवडणुकांना डोळ्या समोल ठेऊन भाजपने बिहारच्या जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला. विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. बिहारमध्येच नाही, तर सर्वात मोफत लस मिळाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. त्यामुळेच  मोदींनी नमते घेत सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

२० ऑक्टोबरला देशाला संबोधित करतांना पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की, भारतीय शास्त्रज्ञ वेगवेगळया लशी बनवत आहे. त्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आसल्याचे मोदींनी देशवासीयांना सांगितले होते. प्रताप सारंगी हे पशुसंवर्धन, डेअरी, मासळी खात्याचे राज्यमंत्री आहे. प्रताप सारंगी यांना ओदिशाच्या अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्र्यांनी एक प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना सारंगी म्हणाले की, लस सर्वांना मोफत मिळणार आहे.