मुंबई - राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. प्रति तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारकर केले आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

सरकारी लॅबमध्ये सर्व चाचण्या मोफत आहेत, परंतु खासगी लॅबमध्ये पैसे आकारले जातात. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे दर कमी केले आहेत, असेही टोपे म्हणाले. कोरोना चाचण्यांची संख्या वाढावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे टोपेंनी सांगितले. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या करत आहोत. ही संख्या अजून वाढवायची आहे. केंद्र सरकारने ४५०० चा दर दिला होता. तो २२०० रुपयांवर आणला. तो पुन्हा १२०० रुपयांवर आणून आता हा दर ९८० रुपयांवर आणला आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

राज्यभरात कोरोना चाचणीच्या दरांचे नवीन स्लॅब आजपासून लागू करण्यात आले असून सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत, यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

[removed][removed]