जालना - जिल्ह्यात मंगळवारी घेण्यात आलेल्या चाचणीत 34 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 141 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. शासकीय अहवालानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील 141 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला.

जालना तालुक्यातील जालना शहर 5, घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव 4, धोडराई 1, नागोबावाडी 1, राजाटाकळी 1, गंगाचिंचोली शिवनगाव 1, अंबड तालुक्यातील अंबड शहर 1, सोनकपिंपरी1, बकसवाडी 1, जामखेड 1, चिंचखेड 4, बदनापूर तालुक्यातील भंकतीखेड 1, धामणगाव 1, वाघ्रुळ 1, शिरसगाव घाटी 1, वंजारवाडी 1, मेव्हना 1 भोकरदन तालुक्यातील राजूर 7अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 33 तर अ‍ॅण्टीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 34 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16492 असुन सध्या रुग्णालयात-169 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5780 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-757 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-66776 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-34 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10476 एवढी आहे.

एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-55233 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-740, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4870 एवढी आहे. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-10, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5291 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-54, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-154 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-169, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-17, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-141, डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-9117, सध्या कोरोना अॅक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1086 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-164321 मृतांची संख्या-273 एवढी आहे. जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.