जालना - जिल्ह्यातील 76 व्यक्तींच्या स्वॅबचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून 64 यशस्वी रुग्णांवर उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

शासकीय अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 64 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील सामान्य रुग्णालय निवासस्थान-2, गायत्रीनगर-1, भाग्योदय नगर-2, नेर-2, वानडगाव-1, सकलेचा नगर-1, सेंट्रल जेल-1, मिलनत नगर-1, जालना शहर-16, परतुर तालुक्यातील- परतुर शहर-1, वरफळ-2, घनसावंगी तालुक्यातील अंतरवाला-2,राजेटाकळी-2, गुरुपिंप्री-5, घनसावंगी शहर-3, जळगाव-1, अवलगाव-2, म.चिंचोली-1, ढाकेफळ-1, बाणेगाव-2, जांब समर्थ-1, तिर्थपुरी-1, अंबड तालुक्यातील पंचायत समिती-3, पोलीस स्टेशन-1, गणपती गल्ली-2, इंद्रानगर-1, पारनेर-1, वडी-1, भाकरवाडी-1, बदनापुर तालुक्यातील वेल्हाडी-1, डोंगरगाव-1, जाफ्राबाद तालुक्यातील वालसा वडाळा-1, टेंभुर्णी-3, कुंभारझरी-1, भोकरदन तालुक्यातील नांजा वाडी-1, वालसावंगी-1, बरंजळा साबळे-2, दगडवाडी-1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा-3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 61 तर अँटीजेन तपासणीद्वारे 15 असे एकुण 76 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15777 असुन सध्या रुग्णालयात- 204 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5535 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-491 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-61062 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-87, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-76 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9622 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-50663, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-642, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4713 एवढी आहे.

गेल्या 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5016 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-37 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-154 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-38, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-204,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-56, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7494, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1877 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-146232 मृतांची संख्या-251 एवढी आहे.जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.