(संग्रहित छायाचिञ)
नवी दिल्ली :
तब्बल आठ ते दहा महिन्यानंतर देशातील महाराष्ट्रासह इतर पाच राज्यात कोरोना झपाट्याने वाढताना दिसत आहे. या राज्यात दररोज येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाल्यानंतर केंद्र सरकार सावध झाले आहे. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी आणि उपाययोजनासाठी केंद्राने पथके नियुक्त केली असून, ही पथके या सहा राज्यांना मदत करणार आहे. 
महाराष्ट्रासह करोनाचे संक्रमण वाढलेल्या राज्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी केंद्राने तीन सदस्यीय पथके नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश केलेला आहे. ही पथके राज्यांना कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पदावरील अधिकारी या पथकांचे नेतृत्व करणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पदावरील अधिकारी या पथकांचे नेतृत्व करणार असून, महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि जम्मू व काश्मीरमध्ये विशेष लक्ष देणार आहे, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

ही पथके काय करणार ?  : ही पथके राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील यंत्रणासोबत मिळून काम करणार आहे. अचानक झालेल्या कोरोना रुग्णवाढीच्या कारणांचा शोध घेईल. कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी पथके राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील आरोग्य यंत्रणांना मदत करणार आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.