परळी : परळीसह बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून काही केल्या कोरोनाचे मीटर थांबत नसल्याने बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 28 सप्टेंबरला आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालात 171 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस चिंतेचे वातावरण पसरत चालले आहे. परळी तालुक्यात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच असून आज आलेल्या अहवालात 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

रोजच रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. विशेषतः शहरी भागात वाढत चाललेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव खेड्यापाड्यातील झपाट्याने पसरत आहे. यामुळे परळी तालुक्यातील बहुतांश गावकुसात कोरोना चा शिरकाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.परळी तालुक्यात आत्तापर्यंत 40 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

परळी तालुक्यात एसबीआय बँकेच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. परळी शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढ चालली आहे. विशेषता कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही सुरू झाला असून तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात कोरोना ने कहर सुरू केला आहे. यामुळे नागरिकात चिंतेचे वातावरण पसरत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

28 सप्टेंबरला आरोग्य प्रशासनाच्या वतीने जाहीर केलेल्या अहवालात परळी तालुक्यात 14, अंबाजोगाई 28, आष्टी 27, बीड 35, धारूर 7, गेवराई 8, माजलगाव 9, केज 22, पाटोदा 2, वडवणी 12, रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

"तालुक्यात 1536 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 926 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 148 जनावर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्के एवढे आहे. मृत्युदर 2.60 टक्के एवढा आहे.तसेच परळी तालुक्यात 40 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाले असल्याची माहिती परळी तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे यांनी दिली."