मुंबई - राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संजय कुमार हे होम क्वारंटाईन झाले आहेत.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी मुख्य सचिव कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीत संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. शनिवारी पॉझिटिव्ह अहवाल आल्यापासून संजय कुमार होम क्वारंटाईन झाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनीही कोरोना झाल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे. पाटील हे दोन दिवसापूर्वी मुंबईत आले होते. त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली होती. पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी आज राजभवनावर जाण्याचे टाळले.

वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जनतेचे प्रेम आणि सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.