औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी ३१७ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३२ हजार ८९ वर मृतांची संख्या ८९३ वर पोहोचली आहे. दरम्यान, गुरूवारी महापालिका हद्दीतील २१६ आणि ग्रामीण भागातील १४६ असे ३६२ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत २५ हजार ०५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ६ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद शहरात आज ९७ रूग्ण आढळले. त्यात शिवशक्ती कॉलनी ६, मिलिट्री हॉस्पीटल ३, राम नगर ३, नंदनवन कॉलनी ३, हनुमान नगर २, साई नगरी, शहानूरवाडी २, जालन नगर २, इटखेडा २, समाधान कॉलनी २, एन अकरा हडको २, भावसिंगपुरा २, म्हाडा कॉलनी २, पद्मपुरा २, गोल्डन पार्क इमारत २, देवळाई परिसर २, नवजीवन कॉलनी, हडको २, फाजिलपुरा १, बन्सीलाल नगर १, मालन नगर १, एन दोन सिडको १, एन तीन सिडको १, एमजीएम हॉस्पीटल परिसर १, पुंडलिक नगर १, औरंगपुरा १, वेदांत नगर १, कोकणवाडी १, वृंदावन कालनी १, गुलमोहर कॉलनी १, संभाजी कॉलनी १, अविष्कार कॉलनी १, शिवनेरी कॉलनी १, पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर १, सरस्वती कॉलनी १, मेहेर नगर १, उल्कानगरी १, हरिसाल पार्क १, सुधाकर नगर १, एन सात सिडको १, जय भवानी नगर १, समर्थ नगर १, नाईक नगर १, टिळक नगर १, बिल्डर सो., नंदनवन कॉलनी १, वसंत नगर १, नवाबपुरा १, एकता नगर १, जटवाडा रोड १, एन बारा, भारतमाता नगर १, एन अकरा गजानन नगर १, जलाल नगर १, सिडको १, हडको १, चिनार गार्डन १, बीड बायपास १, वाणी मंगल कार्यालय परिसर १, मयूर पार्क १, घाटी परिसर १, देवानगरी १,एन सहा सिडको १, गारखेडा परिसर १, बालाजी नगर १, पुंडलिक नगर १, सूतगिरणी चौक १, स्वास्थ्य हॉस्पीटल १, मुकुंदवाडी १, छावणी परिसर १, शहानूरवाडी १, गारखेडा परिसर १, स्वामी विवेकानंद नगर १, श्रीहरी सिडको १, मूर्तिजापूर १,सारा सिद्धी बीड बायपास १ पडेगाव, मिरा नगर १, अन्य १असे रूग्ण आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज १२५ रूग्ण आढळले. त्यात गंगापूर १३, कन्नड १४, वैजापूर १२, भवन ६, पैठण ६, देवपुरा, कन्नड १, वाळूज ४, तीसगाव, वळदगाव १, साजापूर १, बजाज नगर २, देवगिरी नगर, बजाज नगर १, गजानन नगर, बजाज नगर १, महादेव मंदिर परिसर, एफडीसी कॉलनी १, चिंचखेडा कन्नड १, औराळा, कन्नड १, फर्दापूर १, माळीवाडा १, बकवाल नगर, नायगाव २, रांजणगाव, निलजगाव ५, पिंप्री राजा १, जय भवानी नगर, पैठण १, वाहेगाव १, राम नगर, पैठण १, भालगाव, गंगापूर १, नूतन कॉलनी, गंगापूर १, लक्ष्मी कॉलनी २, शिलेगाव १, अकोली वडगाव १, धानोरा, गंगापूर १, शिवाजी नगर, सिल्लोड १, शाहू नगर, सिल्लोड १, चांदापूर सिल्लोड १, टिळक नगर सिल्लोड १, वीरगाव, वैजापूर १, भाटिया गल्ली वैजापूर १, चंद्रपाल नगर, वैजापूर १, रेणुका नगर, वैजापूर १, गुरूदत्त कॉलनी, वैजापूर १, पाटील गल्ली, गंगापूर १, आडगाव कन्नड १, करंजखेडा २, सिद्धेश्वर विहार, कमलापूर ३, शेळके हॉस्पीटल, वाळूज १, हनुमान नगर, कमलापूर १, शिक्षक कॉलनी, रांजणगाव १, औरंगाबाद ९, खुलताबाद २, सिल्लोड १, घाणेगाव १, कमलापूर १, रांजणगाव १, वडगाव को. १, अन्य १, जेऊर १, फत्तेपूर ३ असे रूग्ण आहेत. तीन कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत खुलताबाद येथील ५५ वर्षीय स्त्री, नवयुग कॉलनीतील ७८ वर्षीय पुरूष आणि पैठणमधील ६३ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.