नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने राजधानी दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. सोमवारी रात्री १० वाजेपासून लॉकडाऊनच्या अमलबजावणीला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका असे आवाहन यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केलेय.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “आम्ही चाचण्या कमी केल्या नाहीत तर वाढवल्या. दिल्लीत रोज १ लाख चाचण्या होत आहे. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवलेले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत कधीही खोटे बोललो नाही. जी परिस्थिती आहे ती नेहमी जनतेसमोर मांडत आहोत. दिल्लीमधली कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून रोज २५ हजारांच्या आसपास कोरोना बाधित होत आहेत. दिल्लीत आज १०० पेक्षा जास्त आयसीयू बेड नाहीत, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड दबाव येत आहे. तिला काही मर्यादा आहेत,” असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.