पुणे : देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरण मोहिमेच्या नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीच्या किमती कमी कराव्यात, अशी विनंती केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी 100 रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली. 

टि्वटमध्ये काय म्हणाले आदर पुनावाला ?
आदर पुनावाला यांनी ट्विट करत कोविशील्ड लसीच्या किमती कमी करत आहोत. राज्य सरकारासाठी कोविशील्डच्या एका लसीच्या डोसची किंमत 400 वरुन 300 रुपये करत आहोत, अशी घोषणा आदर पुनावालांनी दिली. लसीच्या कमी केलेल्या किमती तात्काळ लागू होतील. कोविशील्डच्या लसीची किंमत कमी केल्याने देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होईल, असे पुनावाला म्हणाले.

[removed][removed]