अंबड - तालुक्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातला असून विनाकारण फिरणार्‍यांची संख्या वाढल्याने रविवार (दि.12) 27 रुग्णांची वाढ झाली असून आजवर 845 वर पोहचला आहे.

अंबड पंचायत समिती मध्ये कोरोना रुग्णांचा शिरकाव झाल्याने अंबड पंचायत समितीच्या मेन गेटला कुलूप लावून मागच्या दरवाजाने काही तुरळक कर्मचार्‍यांचे कामकाज सुरू होते. पंचायत समिती अंबड येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सोमवार सकाळपासून उर्वरित कर्मचार्‍यांची कोविड टेस्ट आरोग्य विभागाकडून करण्यात आल्याने कर्मचार्‍यांत भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

अंबड तालुक्यात जवळपास 845 कोरोना रुग्णांपैकी 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 709 रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. अंबड येथील कोविड केअर सेंटर मध्ये एकूण 102 रुग्ण उपचार घेत असून तालुक्यात सद्यस्थितीत आज 42 काँटेन्मेंटझोन असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.अंबड तालुक्यातील ग्रामीण भागात 603 तर शहरी भागात 242 कोरोना बाधित रुग्णसंख्या आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य विभागासाठी हा चिंतेचा विषय आहे.

प्रा.आ.केंद्रांनुसार रुग्णसंख्या
केंद्राचे नाव             उपचारमुक्त
अंबड-242                 189
धनगर पिंपरी-104       87
गोंदी-44                     32
जामखेड-69                55
शहागड-230              214
सुखापुरी-72                58
वडीगोद्री-78                74