परळी - शहरासह बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आशादायक आहे. दि.9 ऑक्टोबर पर्यंत बीड जिल्ह्यात 11229 रुग्ण कोरोनाबाधित असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8955 एवढी झाली आहे. आतापर्यंत 339 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 79.75 टक्के तर जिल्ह्याचा मृत्यूदर 3.02 टक्के एवढा आहे.

परळीसह बीड जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा कहर गेल्या काही महिन्यांपासून खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता, परंतु सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने काही प्रमाणात नागरिकांना व प्रशासनाला दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. परळी तालुक्यात 1676 एकूण कोरोना बाधित रुग्ण असून बरे झालेले 1397 रुग्ण आहेत. 83.35 टक्के बरे झाले आहेत.
तर आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झालेला आहे. अंबाजोगाई 1409 कोरोनाबाधित रुग्ण असून बरे झालेले 1094 रुग्ण आहेत. हे प्रमाण 77.64 टक्के आहे. 58 जणांचा मृत्यू झालेला आहे. केज 889 बाधित असून 742 बरे झाले आहेत. प्रमाण 83.46 टक्के आहे. 27 जणांचा मृत्यू झालेला आहे. धारूर 619 बाधित रुग्ण असून 482 बरे झालेले आहेत. 77.87 टक्के प्रमाण आहे तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. वडवणी 370 बाधित रुग्ण असून 331 जण बरे झाले आहेत. प्रमाण 89. 46 टक्के असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

माजलगावात 974 रुग्णसंख्या असून 808 बरे झाले आहेत 82.5 टक्के एवढे प्रमाण आहे. 21 जणांचा मृत्यू झाला आहे. गेवराई तालुक्यात 701 रुग्ण संख्या असून 572 जणांनी कोरोनावर मात केली आहे 81.60 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे. 25 जणांचा मृत्यू झाला आहे. शिरूर 393 रुग्ण असून 345 जण बरे झाले आहेत 87.89 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

पाटोदा तालुक्यात 380 पासून 301 जण बरे झाले आहेत. हे प्रमाण 79.21 टक्के आहे तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. आष्टीत 901 कोरोना बाधित रुग्ण असून 686 जण बरे झाले आहेत. प्रमाण 76.14 टक्के एवढे आहे. तर 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड तालुक्यात 2917 रुग्णसंख्या असून 2197 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 75. 32 टक्के आहे. तब्बल 84 जणांचा मृत्यू झाला आहे.