जालना - जिल्ह्यात बुधवारी 79 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 113 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

शासकीय अहवालानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील 113 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर जालना तालुक्यातील जालना शहर-16, रामनगर हडप सावरगाव-1, दहिफळ -1, क्रांतीनगर-1, मंठा तालुक्यातील मंठा शहर-2, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर-1, करदगाव-1, रांजणी-1, कुंभार पिंपळगाव-1, खालपुरी-2, अंबड तालुक्यातील अंबड शहर-1,अंतरवाली सराटे-2, सातगव्हाण-1, बदनापूर तालुक्यातील वाकुळणी-1, शेलगाव-3, केळीगव्हाण-2, सोयगाव-1, बि. गेवराई-2, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर-2, खाजगाव-4, अकोला देव -1, केळेगाव-5, चिंचखेड -4, हनुमतखेडा-2, निमखेड -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर-5, राजूर-5, चिंचोली-1,पळसखेडा पिंपळी -1, चांधई एक्को -1, उमरखेड-1, खापरखेड -1, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद-2, बुलढाणा-3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 79 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 79 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16,542 असून सध्या रुग्णालयात-194 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5,819 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-358 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-67,176 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटिव्ह नमुने-79 असुन एकुण पॉझिटिव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10,555 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-55,455 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-839, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 4,877 एवढी आहे.