जालना - जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 73 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आजवर उपचार घेत असलेल्यांपैकी 38 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

शासकीय अहवालानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 38 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर-23, मंठा तालुक्यातील मंठा शहर-2, वाटुर तांडा-2, टोकवाडी-1, परतुर तालुक्यातील परतुर शहर-5, शंकरपुर-5, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, शिवनगाव-1, कुंभार पिंपळगाव-1, पानेगाव-2, पिंपळखेड-1, अंबड तालुक्यातील अंबड शहर-4, जामखेड -4, जोगेश्वर वाडी -3, बक्सेवाडी -1, बदनापुर तालुक्यातील केळीगव्हाण-2, दाभाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी -2, खानापुर-1, दहेगाव -2, खाजगाव -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर-1, नळणी-1, भिवपुर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा-2, परभणी -2 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 72 तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 73 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16228असुन सध्या रुग्णालयात-165 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5665 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-439 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-64487 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-327, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-73 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10141 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-53545, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-425, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4816 एवढी आहे.तसेच जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.