नांदेड - रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 45 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

याचबरोबर 55 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39, तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 16 बाधित आले. आजच्या एकूण 1 हजार 45 अहवालापैकी 981 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 174 एवढी झाली असून यातील 17 हजार 979 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 532 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 35 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालानुसार एका बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी विष्णुपुरी नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 514 एवढीच आहे. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 15, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10 असे 45 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 27, मुदखेड तालुक्यात 1, कंधार 3, हिंगोली 1, भोकर 3, लोहा 1, धर्माबाद 2, परभणी 1 असे एकुण 39 बाधित आढळले.