जालना - जिल्ह्यात 49 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 21 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

शासकीय अहवालानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील 21 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, तर जालना तालुक्यातील जालना शहर 12, निधोना 5, राजाटाकळी 1, मंठा तालुक्यातील मंठा शहर 4, टोकवाडी 1, वजर सरकटे 5, अंमडापूर 1, परतूर तालुक्यातील परतूर शहर 1, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी1, कुंभार पिंपळगाव 1, चिंचोली 1, अंबड तालुक्यातील शेवगापाती 2, जामखेड 1, बदनापूर तालुक्यातील सोमठाणा 1, शेलगाव 1, खंदारी 1, जाफ्राबाद तालुक्यातील काळेगाव 1, भोकरदन तालुक्यातील नळणी 1, आसरखेड 1, आन्वा 1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा 6, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 49 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 49 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण 16,764 असुन सध्या रुग्णालयात-247 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती 5,879 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 446 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या
नमुन्यांची संख्या 69,349 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने278, दैनिक पॉझिटिव्ह नमुने 49असुन एकुण पॉझिटिव्ह आलेल्या अहवालाची संख्या 10,848 एवढी आहे. एकुण निगेटिव्ह नमुन्यांची संख्या 57,989 रिजेक्टेड नमुने 49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 445, एकुण प्रलंबित नमुने 185, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 4,937 एवढी आहे. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती23 आहेत. जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.