(संग्रहित छायाचिञ)

औरंगाबाद : गेल्या आठ दिवसांपासून धुवांधार बॅटिंग करत वरुणराजाने फटकेबाजी केली होती. मात्र रविवारपासून पावसाने थोडी विश्रांती घेत नागरिकांना दिलासा दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात गेले आठ दिवस जोराचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद झाली. या पावसामुळे शेतातील पिकांना सर्वाधिक फटका बसला. उभी पिके आडवी झाली. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. कधी नव्हे ते इतका पाऊस पडल्याने शेतात पाणीच पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाला. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातदेखील पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. घरांची पडझड, सखल भागात पाणी असे चित्र शहरी भागात दिसून आले. दरम्यान, रविवारपासून पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
रविवार, 28 व सोमवार 29 रोजी मराठ3वाड्यात पावसाने विश्रांती घेत काहीसा दिलासा दिला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, मराठवाड्यात सोमवारी केवळ 0. 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस पडला नाही तर बीड 0. 8, नांदेड 0. 9, परभणी 0. 1, हिंगोली 0. 07 मिमी पाऊस पडला असून, सोमवारी मराठवाड्यात अवघे 0. 3 पाऊस पावसाची नोंद झाली आहे.